दांडेकर महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात
पालघर, ता. २४ (बातमीदार) : टाटा स्टील लिमिटेड, तारापूर शाखेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी टाटा वायरन फेलोशिप, तर अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांसाठी टाटा ज्योती फेलोशिप देण्यात येते. टाटा वायरन फेलोशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक आठ हजार ५०० रुपये, तर टाटा ज्योती फेलोशिपअंतर्गत वार्षिक २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या स्पर्धात्मक परीक्षेत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांना टाटा वायरन फेलोशिप, तर १० विद्यार्थ्यांना टाटा ज्योती फेलोशिप प्राप्त झाली. शुक्रवारी (ता. २४) आयोजित वितरण सोहळ्यात टाटा स्टील तारापूरचे सीएसआर समन्वयक कुणाल बारी, त्यांचे सहकारी लोहीत बांगेरा, सुमित सोनावणे व राजेश वर्तक उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
---------------------
सीएसआर निधीचा वापर
या वेळी प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी टाटा समूहाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. सीएसआर या संकल्पनेचा प्रसार होण्यापूर्वीच जे. आर. डी. टाटा यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी आर्थिक सहाय्याची परंपरा सुरू केली, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी टाटा समूहाकडून सीएसआर निधीचा प्रभावी वापर केला जात असल्याचे सांगत पालघर परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.