मुंबई

बियाणे, यंत्रसामग्रीवर भरघोस अनुदान

CD

वज्रेश्वरी, ता. २६ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २०२६-२७च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे दिलासा देण्यात येत आहे. भातपिकाचे उत्पादन वाढविणे, जमिनीची सुपिकता सुधारणा करणे आणि मजूर टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने सुधारित भातबियाण्यास ५० टक्के, तर हिरवळीच्या खताच्या बियाण्यास ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
कृषी विभागामार्फत तूर व भातपिकांसाठी कर्जत-३, कर्जत-७, जया, रत्नागिरी-८ तसेच एमटीयू-१०१० या सुधारित आणि अधिक उत्पादनक्षम जातींचे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. हवामानास अनुकूल व अधिक उत्पादन देणाऱ्या या जातींचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे प्रति शेतकरी प्रति एकर २० किलो प्रमाणात ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धैंचा पिकामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पुढील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होते. शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवावे, असे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले.

टोकण यंत्रावर ९० टक्के मदत
शेतीतील वाढत्या मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर भातपिकाची टोकण यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी यंदापासून ९० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसआरटी पद्धतीने लागवड करण्यासाठी किमान पाच टोकण यंत्रांची आवश्यकता असल्याने एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त पाच यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान देय राहील. या पद्धतीमुळे वेळ, खर्च आणि मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. टोकण यंत्र अनुदान योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर १५ मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे
योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे नाव नोंदणी करावी. अर्जासोबत ७/१२ किंवा ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारसंलग्न बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT