मुंबई

शाब्दिक वादातून बाटलीने हल्ला

CD

अंबरनाथ (वार्ताहर) : किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होत अंबरनाथ पश्चिम परिसरात एका तरुणावर काचेच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामकरवाडी, वाळेकर होम्सच्या मागील परिसरात गुरुवारी (ता. २३) रात्री ९.४५ वाजता भास्कर भंगारे (वय २३) मित्रांसोबत उभे असताना सुशांत मुंढे (वय १९) याने ‘दम असेल तर समोरून मार’ असे आव्हान दिले. त्यावर फिर्यादीने ‘तू अजून लहान आहेस’ असे उत्तर दिल्याने आरोपी संतापला. यानंतर आरोपीने भंगारे यांची कॉलर पकडून त्यांना चापट मारली. ते खाली पडल्यावर फुटलेल्या काचेच्या बाटलीने डोके, पाठ आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर वार करून जखमी केले. या घटनेनंतर भंगारे यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मुंढेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

SCROLL FOR NEXT