मुंबई

अस्वच्छता उद्यानांमध्ये लहान मुलांवर वाढले हल्ले

CD

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
अस्वच्छता उद्यानांमध्ये लहान मुलांवर वाढले हल्ले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, शहर आणि उपनगरात ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. पालिकेच्या ज्या उद्यानात अस्वच्छता आहे. अशा उद्यानात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद माडला असून, भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर हल्ले वाढू लागले आहेत. याबाबत पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.

मुलुंड पूर्व भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमालीचा वाढला असून, साईनाथ चौक, म्हाडा वसाहत आणि संभाजी उद्यान परिसरात नागरिक अक्षरशः भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. रात्री उशिरा किंवा पहाटे कामावर जाणाऱ्या नागरिकांना कुत्र्यांच्या टोळ्यांचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागून अपघात घडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. याहून धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असूनही पालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे स्थानिक सांगत आहेत.

पालिका दरवर्षी निर्बीजीकरण मोहिमेचा गाजावाजा करते. मात्र, प्रत्यक्षात त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने पालिकेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कुत्रे चावल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, पण खासगी रुग्णालयातील आकडेवारीच उपलब्ध नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे.

पूर्व उपनगरातील अनेक उद्यानांमध्ये अस्वच्छता आहे. तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. आता त्यांनी लहान मुलांना लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी ठोस जागा किंवा दीर्घकालीन योजना पालिकेकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT