सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा!
मनसेचे नेते अविनाश जाधव यांची मागणी
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये येऊन प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी यासंदर्भात शुक्रवारी (ता. २४) नवघर पोलिसांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
चालकांना मराठी अनिवार्य केले या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते गुरुवारी (ता. २३) भाईंदर पूर्व येथे रिक्षाचालकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी राज ठाकरे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. त्यांच्यात आणि सदावर्ते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील प्रकार टळला. मात्र त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा बजावल्या. शुक्रवारी (ता. २४) मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी नवघर पोलिस ठाण्यात जाऊन सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
-----------
मराठा आंदोलकांप्रमाणेच स्वागत
सदावर्ते गरज नसताना कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करतात. त्यांच्या वक्तव्यामुळे तणाव निर्माण होत असतो. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याची माहिती जाधव यांनी दिली. ४ तारखेला पुन्हा भाईंदरमध्ये येणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे. हिंंमत असेल तर त्यांनी मिरा-भाईंदरमध्ये येऊनच दाखवावे. मनसे मराठा आंदोलकांप्रमाणेच त्यांचे स्वागत करतील, असे आव्हान अविनाश जाधव यांनी या वेळी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.