मुंबई

ठाण्याच्या पाचपाखाडीत ११ तास वीज खंडित

CD

पाचपाखाडीत ११ तास वीज खंडित; घोडबंदर रोडवरही अंधार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ऐन उन्हाळ्यात ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात तब्बल १० ते ११ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. भूमिगत विद्युत वाहिनीत बिघाड झाल्यामुळे नितीन कंपनी जंक्शन, नामदेववाडी परिसरातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झाला होता. दरम्यान, घोडबंदर रोड परिसरातही केबलचे नुकसान झाल्याने सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला.
पाचपाखाडीतील नितीन कंपनी जंक्शन व नामदेववाडी परिसरात शुक्रवारी (ता. २४) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लो टेन्शन (एलटी) वितरण केबलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा बंद पडला. नेहमीप्रमाणे काही वेळात पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. प्रत्यक्षात मात्र सायंकाळी साडेचारनंतरच वीजपुरवठा पूर्ववत झाला.
महावितरणची बहुतांश कामे कंत्राटी यंत्रणेमार्फत केली जात असल्याने पहाटे झालेल्या बिघाडावर तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही. संबंधित कर्मचारी उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने दुरुस्तीला विलंब झाल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान काँक्रीट रस्त्याखालील केबलमध्ये दोष आढळून आला. त्यानंतर रस्ता खोदून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. महापालिकेकडून उशिरा परवानगी मिळाल्यानेही कामास विलंब झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
दिवसभर वीज नसल्याने उकाड्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना याचा फटका बसला. महावितरणच्या नियोजनाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

घोडबंदर रोड अंधारात
घोडबंदर रोड (उत्तर) परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ५.२५ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला. एमएसईडीसीएलच्या माहितीनुसार, एमएमआरडीएच्या रस्तेकामादरम्यान जेसीबीच्या खोदकामात २२ केव्हीए मुख्य केबलचे नुकसान झाले. स्टेम कार्यालयाजवळ ही घटना घडली असून, त्यामुळे चार ते पाच तास वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT