महानिर्मिती उभारणार ३०० मेगावॉटचे सौरप्रकल्प
एका ठिकाणी किमान २५ मेगावॉटचा प्रकल्प बंधनकारक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्याची हरित ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी महानिर्मितीने तब्बल ३०० मेगावाॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात किमान २५ मेगावाॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याकरिता इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. कार्यादेश जारी केल्यानंतर सुमारे दीड-दोन वर्षांत या प्रकल्पाची उभारणी करून तो कार्यान्वित करणे बंधनकारक असणार आहे.
महानिर्मितीची सध्याची एकूण वीजनिर्मिती क्षमता १३ हजार ५०० मेगावाॅट असून, त्यापैकी १० हजार मेगावाॅटचे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. सध्या हरित ऊर्जा म्हणून सौर आणि पवनऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महानिर्मितीने ठिकाठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे. आता आणखी ३०० मेगावाॅटचे प्रकल्प उभारण्यासाठी महानिर्मितीने निविदा मागवल्या आहेत. हा प्रकल्प राज्यात कोणत्याही ठिकाणी उभारता येणार असून, जमीन उपलब्धता, सोलर पॅनेल ग्रीड कनेक्टिव्हिटी आदी बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे. त्यामुळे महावितरणला आपले हरित ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पातील वीज उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.