मुंबई

अंबरनाथमध्ये भाडेकरूचा मृतदेह आढळला; दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यूची शक्यता

CD

अंबरनाथमध्ये भाडेकरूचा मृतदेह आढळला
दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता

अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) ः अंबरनाथमधील आनंदविहार संकुलात एका सदनिकेत भाडेकरूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. किरण येळणे (४९) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे नागपूर येथील रहिवासी होते. ते अंबरनाथ एमआयडीसीत नोकरी करीत होते. ते संबंधित इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटेच भाड्याने राहत होते.
भाडेकरू असल्याने त्यांचा इमारतीतील इतर रहिवाशांशी फारसा संपर्क नव्हता. दोन दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकाने त्यांना घरी येताना पाहिले होते; मात्र त्यानंतर ते कुटुंबीयांचे फोन उचलत नसल्याने संशय निर्माण झाला. कुटुंबीयांनी शेजाऱ्यांशी संपर्क साधला असता सदनिकेचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याचेही लक्षात आले. याबाबत तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी शिडीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला असता बेडरूममध्ये बेडवर झोपलेल्या अवस्थेत किरण येळणे यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांचा मृत्यू झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, त्यातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT