५२ गावांना दिलासा
जलकुंभांच्या दुरुस्तीला मंजुरी, पाणीप्रश्न सुटणार
विरार, ता. २६ (बातमीदार)ः वसई तालुक्यातील ५२ गावांच्या पाणीपुरवठाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेसाठीचे जलकुंभांच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकीय खर्चाला महासभेने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला
वसई-विरार पालिका क्षेत्रातील शहरी, ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सुटावा, यासाठी २००८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ६९ गावांची पाणीपुरवठा योजना आखली होती. या योजनेतून जलकुंभ उभारण्यात आले होते. या योजनेत पालिकेच्या कार्यक्षेत्रातील ५२ गावांचा समावेश होता. या योजनेतून २१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती. मात्र, सुरुवातीला महापालिकेकडे १०० दशलक्ष लिटर पाण्याची तूट असल्याने पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतून उभारण्यात आलेले जलकुंभ कोरडेच राहिले. जवळपास १२ वर्षांपासून जलकुंभ वापराविना पडून असल्याने दयनीय अवस्था आहे. अशातच एमएमआरडीएच्या योजनेतून फेब्रुवारी २०२४ पासून महापालिकेला १७० पैकी १४० दशलक्ष लिटर पाणी दररोज उपलब्ध होत आहे, पण पुरेसे पाणी असताना ग्रामीण भागातील जलकुंभ कार्यान्वित नसल्याने वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ दुरुस्तीसाठी चार कोटी तीन लाख रुपये निधी दिला आहे. या खर्चाला महासभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जलकुंभांच्या दुरुस्तीची कामे लवकरच मार्गी लावून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
================================
१० महिन्यांपूर्वी लेखापरीक्षण
६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेतून ५२ जलकुंभ दुरुस्त करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. या वेळी जलकुंभ सुस्थितीत आहेत का, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० महिन्यांपूर्वी जलकुंभांचे संरचनात्मक लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. त्यात ५२ पैकी एक नायगाव येथील जलकुंभ निष्कासित करण्यात आला आहे, तर ५१ जलकुंभ दुरुस्तीनंतर वापरात आणता येतील, असे सांगण्यात आले.
===============================
‘या’ जलकुंभांची दुरुस्ती
बोळिंज, कोफराड, आगाशी, डोंगरी, वटार, उमराळे, चंदनसार, राजोडी, नाळे, वाघोली, मर्देस, नवाळे, निर्मळ, गास, भुईगाव (खु.), भुईगाव (बु.), काशिदकोपर, कणेर, मांडवी, चांदिप, शिरसाड, पेल्हार, धानिव, बिलालपाडा, जुचंद्र, सातीवली, चिंचोटी, कोल्ही, कामण, देवदळ, बापाणे, सांडोर, उमेळा, वडवली, कीरवली, चोबारे, मुळगाव, कौलार (खु.), गिरीज, सालोली, कौलार (बु.).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.