मुंबई

रिक्षा चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद

CD

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : तुर्भे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत रिक्षाचोराला अटक केली आहे. नीलेश सुभाष पाटील (वय ४२) याच्या अटकेमुळे तुर्भे आणि खारघर परिसरातील रिक्षाचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून तीन वाहने जप्त केली आहेत.

३ एप्रिलला तुर्भे पोलिस ठाण्यात रिक्षाचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक समीर चासकर, हवालदार मिलिंद कांबळे, नाईक किरण घुगे, अमित तडवी आणि पोलिस शिपाई सुनील सकट आदींच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. त्यानंतर गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी नीलेश याला महापे येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तुर्भेच नव्हे तर खारघर परिसरातूनही रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून एकूण दोन लाखांच्या तीन रिक्षा जप्त केल्या आहेत. यापूर्वी त्याच्यावर कोपरखैरणे पोलिस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममतांच्या 'तृणमूल'चं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Pattankodoli ZP Member : राहुल आवाडेंना धक्का, पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध; निकालानंतर तरूणांचा जल्लोष

Uruli Kanchan News : जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षांच्या निष्पाप बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Rohit Sharma: रोहित शर्मा रचणार नवा इतिहास! अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच मोडणार ३७ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा पराक्रम

IND A vs AFG A: ३४९ धावा करूनही भारत हरला... अफगाणिस्तानचा संघ २५.५ षटकांत विजयी झाला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT