मुंबई

स्कायवॉकवरील लिफ्ट धुळखात

CD

स्कायवॉकवरील लिफ्ट धूळखात
कोपरखैरणे परिसरातील बंद लिफ्टमुळे ज्येष्ठ, दिव्यांग त्रस्त; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील कोपरखैरणे एमआयडीसी परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या स्कायवॉकवरील कोट्यवधी रुपयांच्या लिफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. या लिफ्टची देखभाल न झाल्याने त्या धूळखात पडल्या असून परिसरात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि सर्वसामान्य पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, बंद लिफ्ट परिसरात भंगार साचल्याने नशेखोरांचे अड्डे निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ठाणे-बेलापूर हा नवी मुंबईतील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांची सततची वर्दळ लक्षात घेऊन अपघात टाळण्यासाठी महापालिकेने येथे आधुनिक स्कायवॉक उभारला होता. ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी विशेष लिफ्टची सुविधा देण्यात आली होती; मात्र या लिफ्ट बंद पडल्याने नागरिकांना उंच जिने चढावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांना स्कायवॉक वापरणे कठीण झाले असून काहीजण जीव धोक्यात घालून रस्ता थेट ओलांडताना दिसतात.


आंदोलनाचा इशारा
सामाजिक कार्यकर्त्या रेणू पांडेय यांनी महापालिकेकडे तत्काळ लिफ्ट सुरू करण्याची, परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनीही या समस्येवर लवकरात लवकर उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.


नशेखोरांचे अड्डे
लिफ्ट परिसरात भंगार साचून नशेखोरांचे अड्डे तयार झाले आहेत. सीसीटीव्ही व सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांच्या मते, लिफ्टच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि टाकाऊ साहित्य साचले आहे. काचा फुटलेल्या असून जागा असुरक्षित बनली आहे. रात्रीच्या वेळी येथे असामाजिक कृत्ये घडत असल्याचेही निदर्शनास आले आहे. सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT