मुंबई

उल्हासनगरच्या एआरटी सेंटरला राष्ट्रीय सन्मान

CD

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : राष्ट्रीय स्तरावर आरोग्यसेवेत उल्हासनगरने ठसा उमटवत मध्यवर्ती रुग्णालयातील एआरटी सेंटरने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. आंध्र प्रदेश येथे झालेल्या केंद्रीय समीक्षा बैठकीत एआरटी सेवा प्रदान क्षेत्रात महाराष्ट्र राज्याला देशात प्रथम श्रेणीचा मान मिळाला आहे. या यशात उल्हासनगरच्या एआरटी सेंटरचा मोलाचा वाटा ठरला आहे.
सीएसटी विभागाच्या या केंद्रीय बैठकीत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत कार्यरत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील एआरटी सेंटरच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी व संपूर्ण टीमने समन्वय, सेवाभाव आणि कार्यतत्परतेच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली. या यशाबद्दल डॉ. अविनाशकुमार धनावडे, किशोर अहिरराव, कलश्री धमके, सोनाली वानखडे, सोनाली गेडाम, समिता नार्वेकर, रेखा बेळगावकर, रुपाली इंगोले, सुनील अहिरे, सुहास बागुल आणि समिना मुल्ला यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. उल्हासनगर एआरटी सेंटरच्या या यशामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP राजकारणात मोठा ट्विस्ट! लोकप्रियता टिकली, पण मंत्री अडचणीत; ३३ मंत्र्यांवर जनतेची नाराजी उघड

IPL 2026 Point Table: 'साई'कृपा! गुजरात टायटन्सचा शानदार विजय! चेन्नई सुपर किंग्सला नमवून गुणतालिकेत घेतली मोठी झेप...

Farmer Agri Theft Paithan: पाचोड परिसरात शेतकऱ्यांच्या पंप-केबल चोरीचा कहर; विहिरींना पाणी असूनही पिके होरपळली

CSK vs GT Live: Ohh shit! चेन्नईच्या खेळाडूच्या तोंडावर चेंडू आदळला, डोळा थोडक्यात वाचला; काळजाचा ठोका चुकला

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको! महाराष्ट्र सरकारचे शाळांसाठी कडक मान्सून नियम; पण कोणते? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT