मुंबई

भागवत सोनोने यांचा राज्यस्तरीय गौरव

CD

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : नगर परिषदेचे अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि धाडसी सेवेबद्दल राज्य सरकारतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडलेल्या ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ समारोप कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राज्याचे अप्पर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज आणि सहसचिव प्रियंका छापवाले यांच्या हस्ते सोनोने यांना सन्मानित करण्यात आले. सोनोने यांनी अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ७० मीटर उंचीचे अत्याधुनिक शिडी वाहन ताफ्यात दाखल करणे, पाच नवीन अग्निशमन केंद्रे उभारणे आणि अपुऱ्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी प्रशिक्षित फायरमनची भरती करणे ही त्यांची प्रमुख कामे आहेत.​ २००५चा महापूर, २०१९ मधील महालक्ष्मी एक्स्प्रेस बचाव कार्य, तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळे, तसेच कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला, निफ्टी 23,900 पार; सेन्सेक्स-निफ्टीत अचानक वाढ का?

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : पुण्यात आजपासून पाणी कपात

SCROLL FOR NEXT