मुंबई

नवी मुंबईत कोल्ह्यांचा वाढता वावर!

CD

नवी मुंबईत कोल्ह्यांचा वाढता वावर!
सीवूड्स-घणसोली परिसरात दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बेलापूर, ता. २६ ( बातमीदार)ः शहरातील वाढत्या नागरीकरणासोबत वन्यप्राण्यांचा वावरही वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. बेलापूर व खारघर परिसरात यापूर्वी बिबट्यांचे दर्शन घडले होते, तर आता घणसोली आणि सीवूड्स परिसरात कोल्ह्यांचा मुक्त संचार नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात घणसोली येथील मेघ मल्हार सोसायटीजवळ कोल्ह्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर काही महिन्यांपासून अधूनमधून या भागात कोल्हे दिसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडेच शनिवारी सायंकाळी सीवूड्स सेक्टर ५० तसेच बेलापूर पालिका मुख्यालय परिसरात कोल्हे आणि त्यांची पिल्ले आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
या घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये कोल्हे बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे सकाळी व सायंकाळी जॉगिंग, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नागरिकांनीही सतर्क राहून अशा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कोल्ह्याला जेरबंद करा
स्मार्ट शहरात सर्व सोयीसुविधांची पूर्तता होत असताना बिबट्या, कोल्हा या वन्यजीवांचा शहरात खुलेआम वावर आढळून येत आहे. वेळीच या कोल्ह्यांना जेरबंद करा अन्यथा अपघाताला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांवर हल्ला करण्याआधी वेळीच या कोल्ह्याना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कोट
कोल्हा निशाचर प्राणी आहे. शहरात बऱ्याचशा कचराकुंड्या आहेत त्या जागी हे उंदीर अथवा अन्य खाद्य खाण्यासाठी येत आहेत. आम्ही सध्या याबाबत मॉनिटरिंग करत असून, नागरी वस्तीत आढळून येणाऱ्या कोल्ह्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न करत आहोत.
- रोहित मोहिते, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

SCROLL FOR NEXT