मुंबई

उन्हाच्या झळांत पक्ष्यांना दिलासा

CD

टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : वाढत्या उन्हाच्या तडाख्यात पाण्याअभावी पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असताना जनता हित फाउंडेशन ट्रस्ट यांनी संवेदनशील उपक्रम राबवत नागरिकांना पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे पक्ष्यांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने प्रत्येकाने आपल्या अंगणात, गॅलरीत किंवा परिसरात पाण्याचे कुंडे अथवा मातीची भांडी ठेवावीत, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांनी सांगितले.
छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो, असा संदेशही कांबळे यांनी दिला. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी आपल्या परिसरात ठेवलेल्या पाण्याच्या कुंड्यांचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी नागरिकांमधून पहिल्या तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. सर्व सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. ही स्पर्धा २७ एप्रिल ते ५ मे या कालावधीत पार पडणार आहे. निकाल ८ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. दररोज पाण्याच्या कुंड्यांचे फोटो पाठविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पक्षी संवर्धन आणि निसर्ग संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असून, या उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलता वाढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT