मुंबई

फर्निचर कामाच्या बहाण्याने लाखोंचा माल लंपास

CD

ठाणे ,ता. २७ : मुंब्रा परिसरात फर्निचर कामासाठी बोलावलेल्या सुतारांनी विश्वासघात करत घरातील महागडे मशिनरी व साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एकूण एक लाखाचा ऐवज चोरल्याप्रकरणी तिघांविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा येथे राहणारे तक्रारदार सैझी इक्बाल अहमद सैफी (वय २९) यांचे शिळफाटा येथे हार्डवेअरचे दुकान आहे. घरातील फर्निचरचे काम करण्यासाठी त्यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये ओळखीच्या माध्यमातून कल्याणफाटा येथून तार फैजान हसन, फहाद हसन आणि हमाद हसन यांना काम दिले होते. सुरुवातीला त्यांनी काम सुरू केले; मात्र काही दिवसांतच हे तिघे अचानक काम अधांतरी सोडून निघून गेले. यानंतर त्यांनी तपासणी केली असता, त्यांच्या दुकानासाठी आणलेली नवीन मशिनरी व साहित्य गायब असल्याचे लक्षात आले. संबंधितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांनीच चोरी केल्याची खात्री झाल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT