मुंबई

रिया चक्रवर्तीची बॅंक खाती खुली

CD

रिया चक्रवर्तीची बॅंक खाती खुली

विशेष न्यायालयाकडून ‘एनसीबी’चे आदेश रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह कुटुंबीयांची चार बॅंक खाती गोठवण्याचे आदेश एनडीपीएस विशेष न्यायालयाने नुकतेच रद्द केले. अनिवार्य कायदेशीर तरतुदीचे पालन न करता बॅंक खाती गोठवल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले. तसेच आरबीआयच्या नियमांनुसार ही खाती वापरण्यास परवानगीही न्यायालयाने दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान २०२०मध्ये ही खाती गोठवण्यात आली होती. खाती गोठवण्याच्या कारवाईसाठी एनडीपीसी कायद्यांतर्गत विहित मुदतीत सक्षम प्राधिकाऱ्याकडून एनसीबीने मंजुरी मिळवली नव्हती. परिणामी बॅंक खात्यांवर लादलेली ही निर्बंधात्मक कारवाई कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नसल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. संबंधित प्रकरणात कायदेशीर सुरक्षा उपायांचे पालन केलेले नाही. मालमत्ता गोठवण्याचा किंवा जप्त करण्याचा आदेश काढण्यात आल्यापासून ३० दिवसांत सक्षम प्राधिकरणाकडून पुष्टी मिळाल्याशिवाय ताे लागू होत नाही, असे विशेष न्यायाधीश यू. सी. देशमुख यांनी रिया, तिचा भाऊ शौविक आणि आई संध्या यांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारताना स्पष्ट केले. ही एक गंभीर स्वरूपाची चूक असून, अर्ज मंजूर होण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
-------
सरकारी पक्षाचा विराेध
आरोपींच्या कथित विधानांचा आणि अमली पदार्थांशी संबंध असल्याच्या आरोपांचा हवाला देताना सरकारी पक्षाने याचिकांना विरोध केला होता. तस्करीच्या रकमेसाठी या खात्यांचा वापर केल्याचा आरोप करून खाती गोठवण्याच्या कृतीचे समर्थन केले होते. तथापि, न्यायालयाने खाती गोठवण्याच्या प्रक्रियेतील वैधानिक त्रुटीपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवून ही कारवाई अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT