मुंबई

कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुजय नामे

CD

कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुजय नामे
जोगेश्‍वरी, ता. २७ (बातमीदार) ः अंधेरी कोर्ट बार असोसिएशनच्या २०२६च्या निवडणुकीत सुजय नामे यांनी अध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. वकील वर्गाच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच विजयी पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला.
अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत सुजय नामे यांनी प्रतिस्पर्धी मधुसूदन द्विवेदी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. एकूण १,०६० मतांपैकी नामे यांना ६६८ मते मिळाली, तर मधुसूदन द्विवेदी यांना ३८५ मते मिळाली. या निकालाकडे बार असोसिएशनमधील बदलाचे स्पष्ट संकेत म्हणून पाहिले जात आहे. उपाध्यक्षपदासाठी जे. पी. यादव यांनी ५५७ मते मिळवत विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी अनिल ओझा यांना ४४३ मते मिळाली.
सचिवपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत कुणाल फुले यांनी ५२७ मते मिळवत विजय मिळवला, तर पी. सी. मिश्रा यांना ५०७ मते मिळाली. सहसचिवपदी शैलेश पांडे यांनी ५३२ मते मिळवत विजय मिळवला. त्यांना विपुला नाईक यांच्याकडून कडवी टक्कर मिळाली. त्‍यांना ४८१ मते मिळाली. खजिनदार पदासाठी चौरंगी लढत रंगली होती. यात राकेश यादव यांनी ३४१ मते मिळवत विजय मिळवला. प्रदीप पांडे (३१४), सचिन तळेकर (२६३) आणि अर्चना सिंग (११०) यांना अनुक्रमे मते मिळाली. दरम्यान, विनोद यादव, अजित बिराजदार, आदित्यनारायण मिश्रा आणि संतोष पांडे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड झाली.

Raigad: नांदगावात सापडले राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाची खुण, १४व्या शतकातील शिलालेख; फोटो समोर

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

SCROLL FOR NEXT