मुंबई

वसई विरार महानगरपालिका हद्दीत १ मे पासून घरगणना

CD

वसई-विरारमध्ये महाराष्ट्रदिनी जनगणना
वसई-विरार पालिका क्षेत्रात दोन टप्प्यात प्रक्रिया
विरार, ता. २७ (बातमीदार)ः ‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीद घेऊन देशात १६वी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे. यानिमित्ताने वसई-विरार पालिका क्षेत्रात दोन टप्प्यात घर सूचीकरण, लोकसंख्या गणना केली जाणार आहे.
१ ते १५ मे कालावधीत नागरिकांना स्वगणना अंतर्गत स्वतःची माहिती ऑनलाइन पोर्टलवर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना ३४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
त्यासाठी se.census.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून माहिती भरल्यानंतर एक युनिक आयडी तयार होईल, जो संबंधित प्रगणकास सादर करणे अनिवार्य आहे. यानंतर १६ मे ते १४ जून या काळात नियुक्त प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत ऑनलाइन पोर्टलवर विचारलेल्या प्रश्नांची माहिती नागरिकांनी अचूक भरावयाची आहे.
----------------------
प्रत्येक घर, कुटुंबाची माहिती १ ते ३४ प्रश्नांतून जाणून घेतली जाणार असून, जनगणना कायदा १९४८ नुसार अचूक माहिती देणे नागरिकांना बंधनकारक आहे. वसई-विरार शहर पालिकेतील नागरिकांनी जनगणना प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे.
- अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

Latest Marathi News Live Update : नोएडाच्या सेक्टर १२१ परिसरात एका कारला आग लागली

Bike Accident : धनगरपिंपळगाव येथील तीस वर्षीय प्रवीण पांजगे या दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

SCROLL FOR NEXT