सिग्नल जाहिरातीच्या फलकाने झाकला
लिंक रोडवर प्रवास करणारे वाहनचालक संभ्रमात
मालाड, ता. २७ (बातमीदार) : मालाड पश्चिम येथील लिंक रोड आणि पन्नालाल घोष मार्ग येथील सिग्नल चक्क जाहिरातीच्या फलकामुळे झाकला गेला आहे. या प्रकारामुळे येथील चालक संभ्रमात पडले आहेत. नेमका सिग्नल सुरू आहे की बंद याची काहीच कल्पना नसल्याने येथे वाहतूक कोंडीसारखे प्रश्न निर्माण झाले आहेत.
या मार्गावरून मालाडहून गोरेगावच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नलच झाकला असल्याने पन्नालाल घोष मार्गावरून येणारे वाहन हे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा येथे वाहतूक कोंडी होत आहे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रात ही वाहतूक कोंडी एवढी जास्त असते की, सतत वाजणाऱ्या हॉर्नमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जात असल्याने सिग्नल न दिसल्यामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक फटका बसत असल्याच्या तक्रारीही वाहनचालकांनी केल्या आहेत.
यासंदर्भात ‘पी’ उत्तर विभातील वरिष्ठ अनुज्ञापण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. कार्यालयात या व त्यावर सविस्तर चर्चा करू, असे ते म्हणाले.
-----------------
पालिकेच्या ‘पी’ उत्तर विभागीय कार्यालयातील अनुज्ञापन विभागाला याबाबत माहिती आहे का, असा प्रश्न स्थानिकांनी केला आहे. तसेच सिग्नलवर लावण्यात आलेल्या जाहिरातीवर कारवाई करणार का? असेही त्यांच्या वतीने विचारण्यात येत आहे.
----------------
रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबांवर अनधिकृत बॅनर लावून शहराचे सौंदर्य बिघडवले जात आहे. तसेच शहरी नियोजनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे मुंबई महापालिकेला महसुलाचाही थेट तोटा सहन करावा लागत आहे. अशा उघड उल्लंघनांकडे महापालिकेचे सतत दुर्लक्ष होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
- शोएब नेवरेकर, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.