मुंबई

मुंबईच्या खेळाडूंची जपानमध्ये दमदार कामगिरी

CD

मुंबईच्या खेळाडूंची जपानमध्ये दमदार कामगिरी

घाटकोपर (बातमीदार) : जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी जपानमध्ये आयोजित जपान ओपन इंटरनॅशनल तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा २४ ते २७ एप्रिलदरम्यान जपानमधील ओहामा दाईशिन अरेना, साकाई (ओसाका) येथे पार पडली. या स्पर्धेत पूमसे आणि क्योरुगी या प्रकारांचा समावेश होता. जगभरातील विविध देशांमधून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतल्यामुळे स्पर्धेला उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले होते. मास्टर जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या संघाने भारताचे प्रतिनिधित्व केले. संघाने इंडिव्हिज्युअल पूमसे तसेच पेअर पूमसे प्रकारात उत्कृष्ट सहभाग नोंदवला. मिक्स पेअर पूमसे प्रकारात तनिष्का वेल्हाळ आणि विक्रांत देसाई यांनी शानदार प्रदर्शन करत कांस्य पदक पटकावले. याशिवाय, १२ वर्षांखालील गटात तनिष्काने वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक, तर १८ वर्षांवरील गटात विक्रांत देसाईने रौप्यपदक मिळवत देशाचा गौरव वाढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT