मुंबई

चलो गिरनारची हाक

CD

चलो गिरनारची हाक

घाटकोपर (बातमीदार) : श्री गुरू दत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुजरातमधील गिरनार पर्वतावरील गुरुशिखर येथे असलेल्या श्री दत्त महाराजांच्या पवित्र पादुकांच्या संरक्षणासाठी राज्यव्यापी अभियान जाहीर करण्यात आले आहे. ‘चलो गिरनार लाखोंच्या संख्येने’ अशी हाक समस्त दत्तभक्तांना देण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. या अभियानासाठी शांततामय मार्गाने मोठ्या संख्येने भक्तांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेचा मुख्य कार्यक्रम १९ आणि २० जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी गिरनार येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून एकता आणि श्रद्धेची ताकद दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री गुरुदेव दत्तात्रयांनी दिलेली जबाबदारी ओळखून या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरु दत्तात्रेय समस्त भक्त मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Raigad: नांदगावात सापडले राजा हंबीरराव यांच्या अस्तित्वाची खुण, १४व्या शतकातील शिलालेख; फोटो समोर

DC vs RCB Live: सामन्यापूर्वीच दोन्ही संघांना धक्का! लुंगी एनगिडीबाबत महत्त्वाचे अपडेट्स, तर गतविजेत्यांचा स्टार फलंदाजाची माघार

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; राजकीय वर्तुळात खळबळ; जिल्हा उपनिबंधक पाहणार कारभार

पोलिसांचा मोठा निर्णय! आरोपींना फुल कपड्यांवर बंदी, ड्रेस कोड लागू... कोठडी सुरक्षेसाठी नवे नियम

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

SCROLL FOR NEXT