मुंबई

किरकोळ वादातून वेटरचा ग्राहकावर हल्ला

CD

​अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : एका देशी बारमध्ये ग्राहकाच्या डोक्यात वेटरने काचेचा ग्लास मारून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी वेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

​चिंतामण दगडू हरड (वय ३१, रा. उल्हासनगर) हे अंबरनाथ पूर्वेकडील एका देशी बारमध्ये गेले होते. ते आपल्या टेबलवर बसले असताना, त्याच टेबलवरील दुसरा एक ग्राहक आणि बारमधील वेटर संतोष ओमकारनाथ पुरी (वय ४५) यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. हरड यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने वेटर पुरी याने, तू आमच्या भांडणात का पडतोस, असे म्हणत चिंतामण यांची मान धरत, त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात वेटरने हातातील काचेचा ग्लास चिंतामण यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

SCROLL FOR NEXT