मुंबई

लग्नास नकार दिल्याने तरुणीला मारहाण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : वागळे इस्टेट परिसरात लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणीवर मारहाण करून तिचे घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तरुणासह त्याच्या आई व दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी (वय २०) ही अंबिकानगर क्रमांक २, रोड क्रमांक २९ येथे राहते. त्याच परिसरात राहणारा यश ऊर्फ रघु (वय २५) याच्याशी तिची ओळख होती. पाच वर्षांपूर्वी त्याने प्रेम व्यक्त केले होते; मात्र तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतरही आरोपीकडून सतत लग्नासाठी दबाव टाकला जात होता. याबाबत तरुणी व तिच्या आईने काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जाऊन समज दिली होती, तरीही त्याचा छळ सुरूच होता. २४ एप्रिलला रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास आरोपी यश हा आपल्या आई मीना, बहीण मयुरी व आत्येबहीण सोनल यांच्यासह तरुणीच्या घराखाली आला. त्याने तिला खाली बोलावून ‘लग्नास नकार का दिला’ या कारणावरून शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या आई व बहिणींनीही मारहाण करत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, तरुणीचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कुटुंबीय तक्रार देण्यासाठी निघाले असताना यशने दरवाजावर ज्वलनशील पदार्थ ओतून काडीपेटीने आग लावली. या वेळी त्याच्या आई व बहिणींनीही त्याला प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तरुणीच्या वडिलांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर संपर्क साधला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. शेजाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. याप्रकरणी मारहाण, धमकी व जाळपोळ करण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

SCROLL FOR NEXT