मुंबई

स्थायी समितीत २० प्रस्तावांना मंजुरी

CD

कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (ता. २४) सभागृहात पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकूण ३५ विषयांच्या अजेंड्यापैकी २० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर विविध कारणांमुळे १५ प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले. स्थायी समितीचे सभापती मल्लेश शेट्टी यांनी मंजूर प्रस्तावांना अधिकृत मान्यता दिली.
बैठकीदरम्यान शहराशी संबंधित विविध प्रश्नांवर सदस्यांनी मते मांडली. विशेषतः सदस्य दीपेश म्हात्रे यांनी फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधले. शहरातील फेरीवाल्यांची संख्या वाढत असून वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर ठोस धोरण आखून प्रभावी कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तक्रारींच्या आधारे वॉर्ड अधिकाऱ्यांकडून काही दुकानांवर सील कारवाई योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवरही बैठकीत तीव्र चर्चा झाली. नाल्यांच्या साफसफाईत होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न उपस्थित करत, पावसाळा जवळ येऊनही संबंधित विभागाकडून निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. वेळेत नालेसफाई न झाल्यास पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर होऊ शकते, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. इतर सदस्यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर यंदा वेळेत प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाले. बैठकीच्या शेवटी प्रशासनाला प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी सर्व कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT