मुंबई

घणसोली गावात ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : घणसोली गावात शेतकरी शाळेसमोर एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. २५) रात्री घडली. रबाळे पोलिसांनी ट्रकचालक जमील अब्दुल वाहीद याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महमद अफान अकील शेख (वय २३) हा तुर्भेगाव येथे राहण्यास होता. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अफान शेख हा मोटारसायकलने (एमएच ०४ जीएल ३०१६) घणसोली गावातून तुर्भेच्या दिशेने जात होता. या वेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अवजड ट्रकने (एचआर ३८ झेड ७१५५) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अफानच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रबाळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT