मुंबई

पथदिवे बंद,

CD

बंद पथदिव्यांनी वाहनचालकांची तारांबळ
सातिवली येथील नवीन उड्डाणपुलावर अंधार
मनोर, ता. २७ ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातिवली येथे नव्याने उभारलेल्या उड्डाणपुलावरील पथदिवे बंद पडले आहेत. या उड्डाणपुलापासून काही अंतरावर वरई गावाच्या हद्दीत मुंबई वाहिनीवरील वांद्री नदीवरील पुलाची दुरुस्ती सुरू आहे, पण उड्डाणपुलांवर काळोख अपघातांना आमंत्रण देत आहे.
उड्डाणपुलावरील अंधारामुळे दृश्यमानता कमी होऊन अपघातांच्या संख्येत वाढली आहे. पथदिव्यांना विजेची जोडणी, पथदिवे सुरू करण्याकडे कंत्राटराकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. दिव्यांअभावी उड्डाणपुलाखाली अंधार पडत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
----------------------------
पाच महिन्यांपासून दुर्लक्ष
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर व्हाइट टॅपिंगच्या कामादरम्यान सातिवली, जव्हार फाटा, नांदगाव फाटा, अच्छाड फाटा येथे उड्डाणपूल उभारणी करण्यात आली. सातिवली येथील उड्डाणपुलाचे वर्षभर लांबलेले बांधकाम डिसेंबरमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली, पण वाहतूक सुरू झाल्यानंतर उड्डाणपुलावर पथदिवे बंद बसवण्यात आले, पण वाहतूक सुरू झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून पथदिवे सुरू करण्यात ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात आहे.
--------------------------
सहाशे कोटींचा खर्च
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अनेक उड्डाणपुलांवरील पथदिवे नादुरुस्त आहेत, पण महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. टाटा सन्स उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरत कार्यालयाने आच्छाडपासून दहिसर चेक नाक्यापर्यंतचा रस्ता ठाणे प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. महामार्गाच्या मजबुतीसाठी सहाशे कोटी रुपये खर्च करून व्हाईट टॉपिंगचे काम करण्यात आले आहे.
-----------------------
महामार्ग प्राधिकरणावर ठपका
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देखभाल दुरुस्तीसाठी नेमलेल्या कंत्राटाच्या करारात पथदिव्यांचा उल्लेख वगळण्यात आला होता. त्यामुळे उड्डाणपुलांवरील पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती, पथदिवे चालू बंद करण्याची कामे ठप्प झाल्याने महामार्ग प्राधिकरणाचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. महामार्गाच्या उड्डाणपुलांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने चालकांची गैरसोय होत आहे.
-------------------
सातिवली उड्डाणपुलावरील पथदिव्यांना वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडे मागणी करण्यात आली आहे.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

अमेरिकन लोक चीनमधून मागवत घर बांधण्याचं सामान! बाजारात ‘चायना होम्स’ची एंट्री; हा नवा ट्रेंड नेमका आहे तरी काय?

'मटका किंग'मध्ये एवढी मोठी चूक? नागराज मंजुळे विसरले पण प्रेक्षकांच्या नजरेतून नाही सुटली ती गोष्ट, म्हणतात- अरे...

Pune Domestic Violence Case: महिला पोलीस अंमलदाराचाच सासरकडून छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT