मुंबई

चिंचणीमध्ये एनसीसी कॅडेट्सकडून सीडबॉलनिर्मिती

CD

चिंचणीमध्ये एनसीसी कॅडेट्सकडून बीजगोळे निर्मिती

वाणगाव, ता. २७ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत चिंचणी येथील एम. के. ज्युनिअर व पी. एल. श्रॉफ महाविद्यालयात पाच व सहा महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेट्सच्या सहभागातून बीजगोळे निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कॅप्टन प्रा. पद्मा माने आणि कॅप्टन डॉ. वनश्री फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी माती, गांडूळ खत, शेणखत तसेच विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बीजगोळे तयार केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव व संवेदनशीलता वाढीस लागल्याचे दिसून आले. तयार करण्यात आलेले बीजगोळे पावसाळ्यापूर्वी परिसरातील डोंगर, माळरान, रिकामी जमीन तसेच वनक्षेत्रात विखुरले जाणार असून, यामुळे नैसर्गिक पद्धतीने वृक्षलागवडीस चालना मिळणार असल्याची माहिती उपक्रमाचे समन्वयक वृक्षमित्र प्रा. सुधीर भांडवलकर यांनी दिली.
-----------
सामूहिक जबाबदारी

या उपक्रमात पर्यवेक्षक दिनकर टेकनर, सूरज आष्टेकर, जनार्दन शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, एकनाथ पाटील, मुशुनूरी शांती, विशाल वाणी आदी प्राध्यापकांसह एनसीसी कॅडेट्स मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. बीजगोळ्यांमधून उगवणाऱ्या झाडांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील बैसाणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिविगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

SCROLL FOR NEXT