मुंबई

कळवा वनविभागाचा अनधिकृत झोपड्यांना दणका

CD

​ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) : कळवा वन क्षेत्रातील अतिक्रमणे वन विभागाच्या रडारवर आली असून, बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन विभागाच्या या ॲक्शन मोडमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. विभागाने राज्य राखीव पोलिस दलाच्या संरक्षणात कळव्यातील अनधिकृतपणे झोपड्यांवर तोडक कारवाई केली. वनजमिनीत उभे राहिलेल्या झोपड्या जमीनदोस्त केल्या. या कारवाईनंतर इतर भागातील अतिक्रमणेदेखील उद्ध्वस्त केली जाणार आहेत.

कळव्यातील वन सर्व्हे क्र. ९७ आणि ४३६ वर मागील काही महिन्यांपासून अनधिकृतपणे झोपड्या उभारण्याचे प्रमाण वाढले होते. या बेकायदा झोपड्यांमुळे वन्यप्राण्यांना बाधा पोहोचण्यासोबतच पर्यावरणालादेखील हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब विचारात घेता वन विभागाचे पथक आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीने या भागातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली. सोमवारी (ता. २७) सकाळी केलेल्या कारवाईत एकूण १६ झोपड्या भुईसपाट केल्या आहेत. ही कारवाई ठाणे वन विभागाचे उप वन संरक्षक सचिन रेपाळे आणि सहाय्यक वन संरक्षक सोनल वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली, तर इंदिरानगर, भास्करनगर, वाघोबानगर, रेतीबंदर आदी भागातील वन विभागाच्या जागेवर असलेल्या अनधिकृत झोपड्या आणि इतर बांधकामांवरदेखील तोडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

​वन क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम अधिक गतिशील करणार आहोत. उंच भागात वाहन घेऊन जाणे कठीण होत असले तरी पूर्ण फौजफाटा आणि पोलिस बंदोबस्त वापरून वनजमिनी अतिक्रमणमुक्त करण्यावर भर दिला जाईल.
- नरेंद्र मुठे, वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आजपासून रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन

SCROLL FOR NEXT