मुंबई

विजेच्या लपंडावामुळे खारघरकर त्रस्त

CD

खारघर, ता. २७ (बातमीदार) : परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभरात अनेक वेळा वीज जाणे आणि कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.

सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच घरातून काम करणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये लिफ्ट बंद पडणे, पाण्याचा पुरवठा विस्कळित होणे यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिकांनाही या समस्येचा फटका बसत असून, दुकाने, हॉटेल्स आणि लघुउद्योगांचे कामकाज ठप्प होत आहे. काही व्यापाऱ्यांनी जनरेटरचा वापर सुरू केला असला तरी त्यामुळे अतिरिक्त खर्च वाढत असल्याची तक्रार आहे.

पूर्वसूचना देण्याची मागणी
वीज वितरण कंपन्यांकडून कोणतीही ठोस माहिती किंवा वेळापत्रक दिले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेकांनी समाजमाध्यमांवरही संताप व्यक्त केला असून, त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे लक्ष वेधत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, तसेच नियोजित देखभाल कामांची पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी केली आहे.

वाढत्या तापमानामुळे घरोघरी, कूलर, वातानुकुलीत यंत्रणा कार्यान्वित केल्या जात असल्यामुळे भारनियमात अचानक वाढ होत असल्यामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाले होते. वीजपुरवठा खंडित होणार नाही. त्यासाठी कर्मचारी, अधिकारी कार्यरत करण्यात आले आहे.
- व्यंकटेश कासल, अतिरिक्त अभियंता, महावितरण खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RCB Live: ८ धावांत ६ फलंदाज बाद! भुवनेश्वर, हेझलवूडचा कहर! साहिलचा त्रिफळा उडाल्यावर विराटने काय केलं पाहा... Video

ST Bus: एसटी प्रवासी-चालकांचे हाल! डिझेल तुटवड्यामुळे उत्पन्नातही घट; बीपीसीएलचा करारही संपला

Jalgaon Temperature : उष्‍णतेच्‍या झळा अधिक तीव्र! सात वर्षांनंतर एप्रिलमध्‍ये पारा ४४ अंशांवर, पुढील दोन दिवस झळा कायम

Akola Exam : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका घोटाळ्याने विद्यार्थ्यांचा संताप

Ice Cream and Chocolate Rate: चॉकलेट-आइसक्रीम महागणार! अनेक ब्रँड्स किंमती वाढवणार; किती रुपयांनी? जागतिक संकटाचा भारतावर परिणाम

SCROLL FOR NEXT