मुंबई

जुन्या वादातून नेरूळमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

CD

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : जुन्या भांडणाच्या रागातून तिघा व्यक्तींनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अर्जुन अशोक गुप्ता (२६) हा नेरूळ येथील शिरवणे परिसरात राहण्यास आहे. तो रविवारी (ता. २६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आपली कार पार्क करून घरी जात होता. या वेळी तो शिरवणे सेक्टर १ मधील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली आला असता अनिकेत पाईक आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्याला अडवले. त्यानंतर जुन्या भांडणाचा राग मनात धरून अनिकेत व त्याच्या साथीदारांनी अर्जुन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघा साथीदारांनी अर्जुन याला पकडून ठेवले, तर अनिकेतने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने अर्जुनच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT