मुंबई

ठाण्यात अल्पवयीन बेपत्ता प्रकरणांत वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : शहरात अल्पवयीन मुले व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, मुंब्रा आणि ठाणे शहर परिसरातून सहा अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या नव्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये चार मुली व दोन मुलांचा समावेश आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंब्रा येथील संतोषनगर परिसरातून २५ एप्रिलला रात्री आठच्या सुमारास १३ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. २६ एप्रिलला पहाटे अमृतनगर, मुंब्रा येथील १७ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली ती अद्याप परतलेली नाही. ठाणे पश्चिमेतील होतकरू मैदान परिसरातून २३ एप्रिलला १५ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला. किसननगर क्रमांक २ येथे २५ एप्रिलला सायंकाळी १६ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली; मात्र परतली नाही. याशिवाय, रूपादेवी पाडा येथे त्याच दिवशी सायंकाळी १५ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तसेच, घोडबंदर रोड परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून ती अद्याप सापडलेली नाही. या सर्व प्रकरणांमध्ये पालकांच्या तक्रारीनुसार संबंधित पोलिस ठाण्यांत अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT