मुंबई

‘राजा शिवाजी’ म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट!

CD

‘राजा शिवाजी’ म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट!
अभिनेता रितेश देशमुख; चित्रपट १ मे रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार

मुंबई, ता. २७ : छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य आणि त्यांनी केलेले कार्य मोठे आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यातून मी त्यांना मानवंदना देणार असल्याचे वक्तव्य अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुख यांनी केले आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. रितेश देशमुख यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी सगळीकडे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी केली आहे. याचे दिग्दर्शन स्वतः रितेश विलासराव देशमुख यांनी केले असून, छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखाही त्यांनीच साकारली आहे. यानिमित्त त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.

दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. इतिहास तज्ज्ञांशी संवाद साधून शक्य तितका वास्तवदर्शी चित्रपट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. महाराजांची भूमिका साकारताना ऐतिहासिक अचूकतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सुमारे २२ ते २३ भव्य सेट्स उभारण्यात आले असून, महाराजांची वेशभूषा तसेच केशभूषा आदी बाबींवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, वाई, महाबळेश्वर आणि सातारा येथे करण्यात आले आहे.
----------------
दिग्गज कलाकारांची भक्कम साथ

या चित्रपटात संजय दत्त, बोमन इराणी, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन आणि जितेंद्र जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. सलमान खानदेखील या चित्रपटात दिसणार आहे.
-----------
संगीतातून वाढणार शौर्याचा उत्साह

या चित्रपटाला संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. ‘छत्रपती’ अँथम हे गाणे शौर्य आणि उत्साह वाढवणारे आहे. या गाण्याला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असून, त्याला तब्बल ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एकूणच ‘राजा शिवाजी’ हा केवळ चित्रपट नसून, भावनिक आणि अभिमानास्पद ऐतिहासिक प्रवास ठरणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

Solapur Sand : भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा, ठेकेदार–महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताविरोधात ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्याकडे धडक तक्रार

SCROLL FOR NEXT