मुंबई

‘थ्रू अवर आयज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

CD

‘थ्रू अवर आयज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि मूल्याधारित शिक्षणाची प्रभावी झलक सादर करणारा ‘थ्रू अवर आयज’ हा अनोखा कार्यक्रम एसआरएमडी डिवाइन टच, घाटकोपर यांच्या वतीने शनिवारी (ता. २५) कैलास टॉवर हॉल, आर. ओडियनसमोर, घाटकोपर (पूर्व) येथे उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून साकारलेली ‘लर्नर-लेड’ प्रदर्शनी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. इंटरॅक्टिव्ह स्टॉल्स, सर्जनशील मांडणी आणि हृदयस्पर्शी सादरीकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मूल्याधारित शिक्षणाचे जिवंत चित्र उभे केले. आपल्या कल्पना, अनुभव आणि शिकवण प्रभावीपणे मांडत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास नगरसेविका राखी जाधव आणि नगरसेवक धर्मेश गिरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ‘थ्रू अवर आयज’ हा कार्यक्रम केवळ प्रदर्शनीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षण अनुभवण्याची एक आगळीवेगळी संधी ठरला. या उपक्रमातून उपस्थितांना नवे विचार, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT