मुंबई

उपायुक्त डॉ. गायकवाड याला न्यायालयाकडून जामीन मंजूर

CD

उपायुक्त डॉ. गायकवाड याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
नवी मुंबई महापालिकेतील लाच प्रकरण

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेचे निलंबित उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड याला सोमवारी सायंकाळी बेलापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ४२ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले गायकवाड याची शुक्रवारी न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

अतिक्रमण नियंत्रण विभागातील एका कंत्राटदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी डॉ. गायकवाड याने ४२ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गत आठवड्यात पालिकेच्या मुख्यालयात सापळा रचून त्याला त्याच्याच दालनात ही लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या अटकेमुळे नवी मुंबई महापालिकेत मोठी खळबळ उडाली होती. अटकेनंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यावर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती; मात्र आज सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Akashvani : पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरूच राहणार; वृत्त विभाग बंद न करण्याचा केंद्राचा निर्णय

Chakur News : तिघांच्या मृत्यनंतर महामार्ग प्रशासनला जाग; चाकूर शहरात येणारा रस्ता बंद, सत्यसाई रोड उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू

Pune Haveli News : १५ वर्षांनंतर यशवंत साखर कारखान्याच्या जमिन विक्रीला मुहूर्त; पुणे बाजार समितीकडून ४९.१८ एकर खरेदी

Hadapsar News : वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच 'इयारा'च्या नावे चौदा प्रकारचा दस्तऐवज

'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

SCROLL FOR NEXT