मुंबई

मिरा रोडमध्ये सुरक्षारक्षकांवर चाकू हल्ला

CD

मिरा रोडमध्ये सुरक्षा रक्षकांवर चाकूहल्ला
भाईंदर, ता. २७ (बातमीदार) : मिरा रोड येथील नयानगर भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (ता. २७) पहाटे ४ वाजता घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे; मात्र या गुन्ह्याच्या तपासात दहशतवाद विरोधी पथक सहभागी झाल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

राजकुमार मिश्रा व सुब्रतो सेन या दोन सुरक्षा रक्षकांशी पहाटे ४च्या सुमारास एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने दोघांवरही चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याची माहिती मिळताच नयानगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व दोघांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी हल्लेखोराचा तपास करून जैब जुबेर अन्सारी याला अटक केली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकही नयानगरमध्ये दाखल झाले व त्यांनीदेखील या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामुळे या हल्ल्यामागचे गूढ वाढले आहे. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT