मुंबई

वारकऱ्यांबाबत वक्तव्य करणे दुर्दैवी : एकनाथ शिंदे

CD

वारकऱ्यांबाबत वक्तव्य करणे दुर्दैवी!

वादग्रस्त वक्तव्याचा एकनाथ शिंदेंकडून निषेध

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महाराष्ट्र ही वारकऱ्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. अशा भूमीत वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रवक्ते विलास लवांडे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.

सोमवारी ठाण्यात नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत, असे त्यांनी सांगितले. विलास लवांडे यांनी केलेल्या विधानावर टीका करताना शिंदे म्हणाले, की अशा प्रकारच्या लबाड्या चालणार नाहीत. वारकरी संप्रदायाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम आहोत. तसेच अशा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्यांच्यावर कोणतीही टीका सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करीत सरकारची भूमिका ठाम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, याच कार्यक्रमात माजी मंत्री विनायक पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. लातूर जिल्हा हा शिंदे सेनेचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मी कालही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. येथे कोणी मोठा किंवा छोटा नाही, मालक किंवा नोकर नाही; आपण सर्वजण एकमेकांचे सहकारी आहोत, असे त्यांनी सांगितले. विकास हाच आमचा अजेंडा असून, सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणणे हे आमचे स्वप्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

SCROLL FOR NEXT