

Thackeray Shivsena Meeting
ESakal
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी 'मातोश्री' या आपल्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला नऊपैकी चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.