सरबत विक्रेत्यांचे लिंबामुळे वांधे
प्रतिनगासाठी आठ ते १० रुपये मोजण्याची वेळ
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) ः उन्हाळ्यात लिंबाच्या सरबताला विशेष मागणी असते; मात्र सध्या बाजारात लिंबाची प्रतिनगाला आठ ते १० रुपयांना विक्री होत असल्याने सरबताची मागणी घटली आहे.
विक्रमगडसारख्या जंगलाच्या पट्ट्यात उष्म्याचा तडाखा लोकांना बसत आहे. रोजगारासाठी बाहेर पडणारे मजूर, गाव, पाड्यांमध्ये लसीकरण किंवा विविध आजारांची सर्वेक्षणे करण्यासाठी, औषधे वाटण्यासाठी फिरतीचे काम करणारे आशा कर्मचारी, गट प्रवर्तक, आरोग्य कर्मचारी हैराण आहेत.
उन्हाची काहिली शमवण्यासाठी अनेकांची लिंबू सरबताला पसंती असते; मात्र लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने हातगाडीवरील थंड पेयांतून लिंबू सरबत हद्दपार झाले आहे.
------------------------
गावरान लोणच्यावर परिणाम
एप्रिलच्या शेवटी विक्रमगड भागातील महिला लिंबू किंवा कैरीच्या गावरान लोणच्याच्या तयारीला लागतात. अनेक महिला बचत गट विक्रीही करतात; परंतु वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा बाजारात लिंबांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे यंदा लिंबाऐवजी अन्य पर्यायांकडे महिलांचा कल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.