मुंबई

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व सर्जनशीलतेची जोपासना

CD

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची झारलीत उकल
जिल्हा परिषद शाळेत दोनदिवसीय शिबिर

कासा, ता. २८ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील झारली येथील जिल्हा परिषद शाळेत मुंबईच्या अध्ययन संस्थेचे दोनदिवसीय उन्हाळी शालेय अभ्यासक्रम शिबिर उत्साहात झाले. या शिबिरात इयत्ता चौथी ते आठवीतील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती, जिज्ञासा निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम करण्यात आला. या वेळी का, कसे, कशामुळे, अशा मूलभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयोगाधारित शिक्षणाची प्रभावी मांडणी शिबिरात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हवेचा दाब, नैसर्गिक घटना तसेच टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ साहित्य निर्मितीसारख्या संकल्पना समजून घेतल्या. विज्ञान केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसून निसर्ग सजीव प्रयोगशाळा असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. या वेळी मधमाश्यांच्या जीवनचक्राविषयी सखोल मार्गदर्शनातून पर्यावरणीय संतुलनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले. याशिवाय नकाशा वाचन, रचना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गावाचे नकाशे तयार करून स्थाननिर्देशन केले.
-------------------
स्वनिर्मितीचा आनंद
शिबिरात वाचन कौशल्य विकासावर भर देण्यात आला. विविध गोष्टींच्या पुस्तकांचे वाचनाबरोबर आधारित प्रश्नोत्तरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समज, अभिव्यक्ती, चिंतनशीलता वाढली. तर हस्तकलेच्या उपक्रमातून कागदापासून विविध वस्तू तयार करून स्वनिर्मितीचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT