रखरखत्या उन्हात जनगणनेचा भार
निकालाच्या तोंडावर शिक्षकांचा जीव मेटाकुटीला
कासा, ता. २८ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील शिक्षकांसाठीचे जनगणना प्रशिक्षण सुरू आहे, पण एकीकडे निकाल लावण्याची लगबग आहे, तर दुसरीकडे प्रशिक्षणामुळे शिक्षकांची दमछाक होत आहे.
एप्रिलच्या अखेरीस तापमानाने उच्चांक गाठला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत डहाणू तालुक्यातील शिक्षकांना जनगणना प्रशिक्षणासाठी २८ ते ३० एप्रिल यादरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिवसभर उपस्थित राहावे लागत आहे. ५०० हून अधिक शिक्षक दूरवरचा प्रवास करून प्रशिक्षणस्थळी येत आहेत, पण वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका असल्याची चिंता शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षकांवर शारीरिक थकवा तसेच मानसिक ताण आला असून, नियोजनाच्या अभावामुळे शिक्षकवर्गात तीव्र नाराजी आहे.
--------------------------------
जागरण करण्याची वेळ
शाळांमध्ये वार्षिक परीक्षेनंतरचा महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. निकाल अंतिम करणे, प्रगती पुस्तके पूर्ण करणे, शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे दाखले, गुणपत्रिका तयार करणे तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. मात्र, पूर्ण दिवस प्रशिक्षणात जात असल्याने सर्व कामे प्रलंबित असून, शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत जागून कामे करावी लागत आहेत.
-----------------------
प्रशासनावर रोष
जनगणना ही महत्त्वाची जबाबदारी आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, एवढ्या कडक उन्हात पूर्णवेळ प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित कामांवर परिणाम होत आहे. प्रशासनाने वेळेत लवचिकता दाखवणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.