मुंबई

रिक्षा अपघातातील जखमी वेदिका शिंदेची नगरसेवक धर्मेश गिरीनी घेतली भेट

CD

रिक्षा अपघातातील जखमी वेदिकाची नगरसेवकांनी घेतली भेट

घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) : घाटकोपर पश्चिम येथील सी.जी.एस. कॉलनीत राहणाऱ्या वेदिका शिंदे या विद्यार्थिनीला घाटकोपर मेट्रो स्थानकातून सर्वोदय जंक्शनकडे जात असताना एका शेअर रिक्षाने जोरात धडक दिल्याची घटना नुकतीच घडली. स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी यांनी वेदिकाच्या घरी भेट देऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली व तिला धीर दिला. या वेळी त्यांनी बेदकारपणे आणि वेगाने रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

या अपघातात वेदिका गंभीर जखमी झाली होती. तिला प्रथम शांती निकेतन रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर कन्नमवार नगर येथील आदी आरोग्यम रुग्णालयात दाखल करण्यात आले. खांद्याला फ्रॅक्चर झाल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. या अपघातात वेदिकाच्या डाव्या डोळ्याजवळ, डाव्या खांद्याला, डाव्या गुडघ्याला तसेच उजव्या पायाच्या पंजाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक रिजवान आझाद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जास्त प्रवासी मिळवण्यासाठी शेअर रिक्षाचालकांची नेहमीच चढाओढ असते. तसेच काही रिक्षाचालक हे नशेत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. यामुळे नेहमीच शेअर रिक्षावाले इतर वाहनांना ओव्हर टेक करणे, जोरात गाडी चालवणे असे प्रकार करत असतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते, असे मत नगरसेवक गिरी यांनी व्यक्त केले. तसेच घाटकोपर आणि विद्याविहार स्थानक परिसरात वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या व नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT