मुंबई

मालवणीतील शहीद अब्दुल हमीद मार्गावर गाळाचा ढीग

CD

रस्त्याशेजारी कचऱ्याचा ढीग
मालवणीतील शहीद अब्दुल हमीद मार्गावरील नागरिकांचा संताप

मालाड, ता. २८ (बातमीदार) : मालाड पश्चिमेच्या मालवणी परिसरातील शहीद अब्दुल हमीद मार्गावर गटारातून काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला तसाच टाकून ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या गटार व नालेसफाईनंतर हा गाळ गेल्या महिनाभरापासून तसाच पडून असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.
पालिकेचे कंत्राटदार गटार किंवा नाल्यातील गाळ काढल्यानंतर लगेच त्याची विल्हेवाट लावत नाहीत. ते काही दिवस तो गाळ सुकण्यासाठी तसाच तेथे सोडून देतात. एकदा हा गाळ सुकला की, तो हळूहळू परिसरात पसरत जातो. तसेच यामुळे परिसरात दुर्गंधीसह काही आजार बळावण्याचाही धोका असतो. मात्र, असे असतानाही कंत्राटदाराकडून कोणतीच कारवाई होत नाही. ही फक्त मुंबईच नाही, तर राज्यातील महत्त्वांच्या शहरातील प्रश्न बनला आहे.

मालवणी परिसरातील ब्लॉक क्रमांक ३ व ४, गेट क्रमांक ६ येथील रमजान अली शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ, तसेच पालिकेच्या दवाखान्यासमोर, त्यानंतर गेट क्रमांक ७ व ८ परिसरातील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला दिसून येतो. येथील स्थानिकांच्या मते, कोरडा झालेला गाळ वाऱ्यामुळे उडत असून, त्यामुळे वायुप्रदूषणात भर पडली आहे. तसेच हा गाळ काही अंशी पुन्हा गटारातच जात असल्याने पालिकेचा सफाईचा उद्देशच फोल ठरत असल्याचे स्थानिक सांगतात.
--------------------
पालिका गाळ उचलणार
याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तर पालिकेच्या ‘पी’ उत्तर विभागाच्या देखरेख व दुरुस्ती खात्याच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपण संबंधित व्यक्तीला याबाबत माहिती देऊन तातडीने तो गाळ उचलायला लावतो, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

SCROLL FOR NEXT