वसईची संस्कृती व कौटुंबिक एकत्र पद्धतीला जपण्याचा प्रयत्न
लेखक बावतीस पेगडो यांचे प्रतिपादन
वसई ता. २८ (बातमीदार) : काही वर्षांपूर्वीची घरे मोठी होती. कौलारु घर, सात हिंदोळे, त्यावर झोका घेत बसलेली आजी असे चित्र असायचे. तसेच विवाहासाठी पूर्वी संपत्ती मोजली जात नसे, तर एकत्र कुटुंब, शेतीवाडीला प्राधान्य दिले जायचे. तसेच याचा आनंद सर्वांना व्हायचा. भांडण तंटा सोडविण्यासाठी सारे गाव एकत्र यायचे. याचा ऊहापोह हा ‘सात हिंदोळ्याची बय’ या पुस्तकातून केला असून, वसईच्या संस्कृतीची व कौटुंबिक एकत्र पद्धतीची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन लेखक बावतीस पेगाडो यांनी नालासोपारा उमराळे येथे केले.
रेव्ह. फादर ऑस्कर कोलासो मेमोरियल मेडिकल असोसिएशनचा रौप्यमहोत्सवी सांगता सोहळा रविवारी (ता. २६) संत जोसेफ चर्च, उमराळे येथे पार पडला. या सोहळ्याला वसई-विरार महापालिकेचे उपमहापौर मार्शल लोपीस, बॅसिन कॅथॅालिक बँकेचे चेअरमन बेनॅाल्ड डायस, पर्यावरणप्रेमी व कवी सायमन मार्टिन तसेच प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सिबल दिब्रिटो तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर नितीन डिसोझा होते. या वेळी संस्थेची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तसेच बावतीस पेगाडो लिखित ‘सात हिंदोळ्याची बय’ या ललित साहित्यकृतीचे प्रकाशन करण्यात आले. वसईतील सुप्रसिद्ध गायिका लॅरिसा आल्मेडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गायन-नृत्य कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष मॅन्युअल मोंटेरो यांनी केली, तर संस्थेच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा ज्येष्ठ सभासद पॉल गोन्साल्वीस यांनी मांडला, तर सूत्रसंचालन जॉयल गोन्साल्वीस आणि फ्रँक मिरांडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन रॉबिन गोन्साल्वीस यांनी मानले.
----------------
वसई : ‘सात हिंदोळ्याची बय’ पुस्तकाचे प्रकाशन उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.