खोपोलीत भीमसैनिकांना आठवले यांचे मार्गदर्शन
‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ मंत्रावर प्रगतीचे आवाहन
खालापूर, ता. २८ (वार्ताहर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांवर चालत जीवनात प्रगती साध्य करण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खोपोली येथे केले.
खोपोली शहरातील यशवंतनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक जयंती महोत्सवात ते बोलत होते. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात समता, ज्ञान आणि बंधुतेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम पार पडले.
या वेळी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदिपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भीमसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला लाभला.
सोहळ्याची सांगता करमणुकीच्या कार्यक्रमाने करण्यात आली. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या भव्य उपक्रमाबद्दल आठवले यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.