ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीनंतर पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून तरुणांना मारहाण आणि घरातील सामानांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजयी उमेदवाराचा स्टेटस समाज माध्यमावर ठेवल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या समर्थकांनी हा प्रकार केला आहे. तरुणांच्या कुटुंबीयांनी अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पीडित तरुणांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात मारहाणीनंतर त्यांच्या घरातील महागडे साहित्यही तोडण्यात आले. गॅस सिलिंडर व इतर वस्तू घेऊन आरोपींनी पलायन केल्याची तक्रार केली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुणांच्या आई-वडिलांना घरी येऊ दिले जात नसल्याने दीड महिन्यापासून त्यांच्यावर घराबाहेर राहण्याची वेळ आली आहे. भाग्यनगर परिसरातील वैशाली सरदार, सविता तेलंग, संगीता सरदार, आशा गावंडे, वैशाली भोंडवे, नर्मदा नाईक आदी महिलांच्या मुलांनी निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. मात्र, निकालात उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर या तरुणांनी विजयी उमेदवाराचा स्टेटस ठेवल्याने समर्थकांनी १४ फेब्रुवारीला त्यांच्यावर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी घरातील कपाटातून एक लाख ८० हजार रुपये घेऊन गेल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर संबंधित समर्थकांनी स्वतःलाच जखमी करून पीडित तरुणांवर उलट खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पीडित कुटुंबीयांनी ठाणे पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता. २७) धाव घेत निवेदन सादर केले आहे. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट महिलांनी भेट घेतली असता, त्यांनी उपायुक्तांना घटनास्थळाची पाहणी करून योग्य तपास करण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.