वाड्यातील विविध समस्यांवर शिवसेना आक्रमक
वाडा, ता. २८ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील कोनसई येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन दोन निष्षाप कामगारांचा बळी गेला असून, या घटनेला काही दिवस उलटले तरी शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्यांच्या सिमेंट क्राॅंकीटीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. या समस्यांचा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर ५ मे रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाडा तालुक्याला जोडणारा वाडा-भिवंडी व वाडा-मनोर रस्ता सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम अंत्यत धीम्या गतीने सुरू आहे. येथे काम करताना ईगल कंपनीने रस्ता सुरक्षेचे नियम न पाळल्याने अनेक निष्पाप जीव जात आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने येत्या पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुरवस्था होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे कोनसई येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट होऊन दोन निष्षाप कामगारांचा जीव गमवावा लागला, तर पाच कामगार जखमी झाले. या प्रकारामुळे तालुक्यातील कंपन्यांमधील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारखानदार औद्योगिक सुरक्षेचे नियम पाळत नसल्याने कामगारांच्या जीवाशी खेळत, अवैधरीत्या व्यवसाय सुरू आहे, यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दोन्ही प्रमुख विषयांसह इतर प्रश्नांचा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवार, ५ मे रोजी वाडा तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देताना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, कांतीलाल देशमुख, डी. व्ही. पाटील, परशुराम भोईर, तुषार भानुशाली, वैभव ठाकरे आणि गोपाळ आगिवळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
============
ठाकरे गटाच्या मागण्या
वाडा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा प्रणालीची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा ही प्रमुख मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. तालुक्यातील अवैध सुरू असलेल्या टायर कंपन्या, दगडखाणी तत्काळ बंद करण्यात याव्यात, वाडा तालुक्याचा समावेश एमएमआरडीएमध्ये करावा, तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करा, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मुबलक भात बियाणे उपलब्ध करून द्यावे, शिरीष पाडा-कोने बिलघर रस्त्याची दुरुस्ती करावी, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणी योजना सुरू कराव्यात, वाडा ग्रामीण रुग्णालयात आयसीयू सेवा सुरू करावी, तालुक्यातील औद्योगिक आस्थापनात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे अशा मागण्या केल्या आहेत.
-----------
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.