मुंबई

मदतीच्या बहाण्याने मित्राकडूनच अत्याचार

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अनाथ तरुणीला तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्यावर, मदतीसाठी धावून आलेल्या समाजमाध्यमावरील मित्रानेच तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी क्रिश भोईर (वय २२) याला अटक केली आहे.

पीडित तरुणी डोंबिवलीत राहत असून, खासगी कंपनीत नोकरी करते. ती अनाथ असून, काही दिवसांपूर्वी तिच्यावर एका खोट्या प्रकरणावरून तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी आरोप केले आणि तिला मारहाण केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीला पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवायची होती, पण सोबत कुणीही नव्हते. अशा वेळी तिने स्नॅपचॅट या ॲपवरून ओळख झालेल्या क्रिशला मदतीसाठी बोलावून घेतले.

क्रिश याने तिला मानपाडा पोलिस ठाण्याला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याने रविवारी (ता. २६) रात्री निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. त्यानंतर तिच्या बँक खात्यावरून ऑनलाइन पैसे वळते केले. तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून घेतले आणि तिचा मोबाईल घेऊन तिथून पळ काढला. या प्रकारामुळे तिने हिंमत करून सोमवारी (ता. २७) सकाळी मानपाडा पोलिस ठाणे गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

नायिका म्हणून गाजवलं दशक, आता ९ वर्षांनंतर पुन्हा मराठी सिनेमात! निशिगंधा वाड यांचं चित्रपटसृष्टीत कमबॅक

SCROLL FOR NEXT