शिबिरात डॉ. मोरे यांचे मार्गदर्शन
मुलुंड ( बातमीदार ) : म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यकर्ता शिबिर नुकतेच युनियन कार्यालयातील सभागृहात पार पडले. सदर शिबिरात मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारचे प्रादेशिक संचालक (से.नि.) डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी कामगार संघटनांचा इतिहास, कामगार संघटनांची वाटचाल व कामगार संघटनांची आव्हाने यावर विस्तृत व बहुमोल मार्गदर्शन केले. आपण युनियन प्रतिनिधी म्हणून सजगपणे कामगारांच्या मागे उभे रहावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची २०२६ साठी कार्यकारिणी अध्यक्ष बाबा कदम यांनी घोषित केली. सदर शिबिरात सर्व नियुक्त कार्यकारिणी सदस्यांना अध्यक्ष बाबा कदम, डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. याप्रसंगी ॲड. रचना अग्रवाल, रंजना नेवाळकर, डॉ. संजय कांबळे-बापेरकर, सुनिल चिटणीस, संजय वाघ, हेमंत कदम, वृषाली परुळेकर, अजय राऊत, संदिप तांबे, महेश गुरव, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे, मंगल तावडे व शिल्पा पोवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.