मुंबई

दांडेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

दांडेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर, ता. २८ (बातमीदार) : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात ‘पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन: भारताचे व्हिजन-२०४७ (ईएसएसजी-२०४७)’ या विषयावर एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय परिषद प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने झाली. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानअंतर्गत आयोजित करण्यात आली.

उद्‍घाटन सत्रात मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लियाकत खान यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून सॅलिसबरी युनिव्हर्सिटी अमेरिका येथील व्हिजिटिंग प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी ‘भारताची २०४७ ची दृष्टी’ या विषयावर विचार मांडले. तसेच प्रख्यात भूगोलतज्ज्ञ डॉ. हेमंत पेडणेकर यांनी शाश्वत विकास आणि पर्यावरण यांचे महत्त्व स्पष्ट केले. परिषदेतील विविध सत्रांमध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापाठीचे प्रा. डॉ. संभाजी शिंदे, अमेरिकेली ह्युस्टन विद्यापाठीचे विजयानंद शेलवराज ह्युस्टन, पुण्यातील डॉ. ज्योतिराम मोरे आणि उत्तर प्रदेशातील आयआयएमटी विद्यापीठाच्या डॉ. तुष्टी शर्मा यांनी विशेषतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक प्रगती आणि सुशासन यासंदर्भात विविध पैलूंवर सखोल चर्चा केली.

या परिषदेत देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. देश विदेशातून २४० संशोधनपत्र, शोधनिबंध या परिषदेत संशोधकांनी सादर केले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने शोध निबंधांचे सादरीकरण, चर्चासत्रे आणि संवाद यांच्या माध्यमातून ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळकटी देणारे महत्त्वपूर्ण विचार मांडले गेले. शेवटच्या सत्रात अनेक संशोधक व प्राध्यापकांनी आपले शोध निबंध पीपीटी स्वरूपात ऑनलाईन सादर केले. या सादरकर्त्या संशोधकांचे कला, वाणिज्य आणि विज्ञान असे तीन गट करण्यात आले होते. त्यातील प्रत्येक गटातून पहिल्या तीन उत्कृष्ट शोधनिबंध सादर करणाऱ्या संशोधकांना आयोजकांमार्फत सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT